दिवा गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई 
मुंबई

दिव्यात हलकल्लोळ... 350 हून अधिक घरे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दिवा शहरात सोमवारी पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईने हलकल्लोळ माजला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ठाणे महापालिकेने 450 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेऊन 350 हून अधिक घरांच्या चाळी भुईसपाट केल्या. रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. ते थेट कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर चढून बसले. मात्र पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने पोलिसी बळाचा वापर करून रहिवाशांचा विरोध झुगारून लावला. 

कारवाई थांबवण्यासाठी काही रहिवासी जेसीबीवर चढले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली व कारवाई पूर्ण करण्यात आली. 

ही बातमी वाचली का? मुंबई उपनगराचे झाले गॅस चेंबर

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून दिवा साबेगाव परिसरातील कांदळवनावरील बेकायदा चाळी पाडण्याची कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली. वास्तविक ही कारवाई गेल्या महिन्यातच पूर्ण केली जाणार होती. मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती. ती कारवाई सोमवारी सकाळीच पुन्हा सुरू करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी हादरून गेले. आपले घर वाचावे यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर उतरून कारवाईला तीव्र विरोध केला. मात्र रहिवाशांच्या संभाव्य आंदोलनाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून 350 हून अधिक घरे भुईसपाट करण्यात आली. 

ही बातमी वाचली का? ...अलिबागमध्ये आता बिनधास्त फिरा

अनेक लहान मुले, वृद्ध आणि महिलांनी कारवाईदरम्यान प्रचंड आक्रोश केला. त्यांना ऐन थंडीच्या दिवसांत बेघर व्हावे लागले. मात्र उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने पालिका आणि पोलिसांनी कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई दुपारच्या सुमारास यशस्वी केली. कारवाईदरम्यान 100 हून अधिक महिला पोलिस तैनात करण्यात आले होते.

आम्हाला शिक्षा का?
पालिका अधिकारी आणि भूमाफियांच्या संगनमतानेच दिव्यातील संबंधित चाळी उभारल्या गेल्या. त्याची शिक्षा आम्हाला का? प्रशासन आमच्या नुकसानीची भरपाई देणार का? असे अनेक सवाल नागरिकांनी उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT