corona 
मुंबई

मुंबईकरांची चिंता कायम ! आज 635 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजाराच्या उंबरठ्यावर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे मुंबईवरील धोका अजूनही कमी झाला नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मुंबईत आज तब्बल 635 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुंबईत मृत्यू होण्याचे प्रमाणातही घट झाली नसून आज तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 387 वर पोहोचला आहे. 

आज मुंबईत 635 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 9758 झाली आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 515 रुग्ण आज आढळले असून 120 रुग्ण 1 ते 3 मे रोजी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. आज झालेल्या 26 मृत्यूंपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या मृतांमध्ये 16 पुरुष: तर 10 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40हून कमी होते; तर 11 रुग्ण 60 वयावरील होते. 13 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते. आज एकूण 406 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 12,306 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 220 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2128 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

स्थालंतरित कामगारांची तपासणी
स्थलांतरित कामगारांना आता पालिकेच्या दवाखान्यांमध्ये दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान आपली आरोग्य तपासणी करता येणार आहे. त्यासाठी कामगारांना आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

डायलिसिस करण्यास विलंब नको
पालिकेने आज पुन्हा एकदा  सर्व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय डायलिसिस रुग्णांकडे डायलिसिस करण्यापूर्वी कोविड तपासणीची मागणी करू नये, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. कोविडची लक्षणे असतील किंवा घरात कोव्हिडचा रुग्ण असेल किंवा संपर्क आला असेल तरच कोव्हिड तपासणीचा सल्ला देण्यात यावा, असे पालिकेने म्हटले आहे. डायलिसिस करण्यात कोणताही विलंब होऊ नये, असेही पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना बजावले आहे.

Today 635 new patients in mumbai, the total number of corona positive is 10 thousand  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT