मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढला आहे. नव्या रुग्णांचा उद्रेक झाला असून आज 8832 नवीन कोरोना रुग्णांची वर्षभरातील उच्चांकी भर पडली. तर मृतांची संख्या ही वाढली असून आज 20 मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील चिंतेत अधिक भर पडली आहे. मुंबईतआज तब्बल 8832 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,32,192 वर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांनी 58,455 हजारांचा टप्पा गाठला आहे. सक्रिय रुग्ण वाढत असल्याने चिंता ही वाढली आहे.
आज दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 724 वर पोहोचला आहे.आज मृत झालेल्या 16 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष तर 07 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णापैकी 3 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते तर 17 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.
दरम्यान 5352 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 3,61,043 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 58,455 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे.
कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.46 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 46 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 41,74,259 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत 70 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 657 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 28,337 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 998 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.
धारावीत 73 नवे रुग्ण
धारावीत आज 73 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5058 वर पोहोचली आहे. तर 694 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये आज 100 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 6284 वर झाली आहे तर 1020 सक्रिय रुग्ण आहेत. माहीम मध्ये सर्वाधिक 120 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 6407 इतके झाले आहेत. तर 1183 सक्रिय रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये आज 293 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 17749 झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.