Matheran sakal media
मुंबई

"माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी व्हिजन ठेऊन काम करण्याची गरज"

माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी योग्य दृष्टिकोन आवश्‍यक; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

माथेरान : माथेरान (Matheran) हे महाराष्ट्राच्या मुकुटातील रत्नमणी आहे. त्यामुळे या शहराच्या विकास आणि पर्यटन वाढीसाठी योग्य दृष्टिकोन (Matheran tourism development) ठेऊन काम करण्याची गरज आहे, असे मत जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केले. माथेरान नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढील काही महिन्यात माथेरानमध्ये पालिका निवडणूक (election) होणार आहे. यासाठी घरत (Mahendra Gharat) यांनी पक्षाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार शहरात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या वेळी घरत यांनी पत्रकारांना सांगितले की, माथेरान पर्यटन वाढीसाठी येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. भ्रष्टाचारमुक्त माथेरान करणे हे काँग्रेसचे ध्येय राहणार आहे. १५ वर्षांपासून तेच तेच चेहरे सत्तेवर असल्याने त्यांची उन्नती झाली; परंतु माथेरानची उन्नती झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला. एका मोठा पक्षाचा नेता माथेरानचा ब्रँड अँबेसिडर होणे हे माथेरानचे दुर्दैव आहे, असा खोचक टोला नाव न घेता आदेश बांदेकर यांना लगावला.

मेळाव्यास रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अखलाक शिलोत्री, महिला रायगड जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस मोनिका पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष सुजाता पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत पवार, काँग्रेस शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT