मुंबई

दादरच्या दर्शन गॅलरीला रमाबाई आंबेडकरांचे नाव

CD

मुंबई, ता. १३ : दादर चौपाटीवर बांधण्यात आलेल्या दर्शन गॅलरीच्या नामकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युईंग डेक’ असे नाव गॅलरीला दिले जाणार आहे. तशी सूचना शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे.

दादरमधील जुन्या पर्जन्यवाहिनीच्या पातमुखावर दर्शन गॅलरी बांधण्यात आली आहे. उद्‍घाटनप्रसंगी गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव द्यावे, असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर तत्काळ शिवसेनेने त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाबाबत स्थानिक प्रभागाला पत्र दिले आहे. आता पालिकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर जाहीर कार्यक्रमात अधिकृतपणे गॅलरीचे नामकरण करण्यात येईल, असे विशाखा राऊत यांनी सांगितले. त्या ठिकाणी संबंधित नावाचा फलकही लावण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबईतील रहिवासी विकास सोरटे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT