High-Court-Mumbai sakal media
मुंबई

गाडी चालवत असताना अचानक झटका; मुंबई हायकोर्टाकडून गुन्हा रद्दबातल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गाडी चालवत असताना अचानक झटका (transient stroke) आल्यामुळे ताबा सुटून अपघात झाला होता. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकावरील गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) रद्दबातल केला आहे. सनदी लेखापाल असलेल्या राजन रुवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका (petitioner) दाखल केली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुसाट गाडी चालवून एका मजुराला जखमी केल्याचा आरोप त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी (Mumbai police) ठेवला होता.

अपघातामध्ये प्रदीप हाजरीकर (३२) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र वाहन चालवताना अचानक रुवाला यांना स्ट्रोक आला आणि त्यांचा ताबा सुटून गाडी पदपथावर आदळली, असा खुलासा त्यांच्यावतीने ॲड. अनादिनी फर्नांडिस यांनी केला.

व्यक्ती जखमी झाल्याचे समजताच ते रुग्णालयात पोहचले आणि सर्व वैद्यकीय खर्च करण्याची तयारी दर्शविली. उपचार सुरू करण्यासाठी त्यांनी हाजरीकर यांच्या खात्यात नव्वद हजार रुपये जमा केले होते, असेही त्यांनी सांगितले. हाजरीकर यांनी देखील तक्रार मागे घेण्यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने रुवाला यांच्यावरील गुन्हा रद्दबातल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT