xe variant of coronavirus  Sakal Media
मुंबई

‘XE व्हेरिएंट’च्या अहवालाची BMC ला प्रतीक्षा; उपप्रकाराबाबत मिळणार माहिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोविडचा (corona) ‘एक्सई’ उपप्रकार (XE Variant) आढळून आल्याचा दावा पालिकेने केल्यानंतर खळबळ माजली आहे. मात्र, केंद्र सरकारने अशा प्रकारचा व्हेरिएंट आढळून आला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संबंधित जिनोम सिक्वेन्सिंगचा डाटा (Genome sequencing data) आयएनएसएसीओजी व एनआयबीजीकडे चाचणीसाठी पाठवण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल (XE variant report) आल्यानंतर संबंधित उपप्रकाराबाबत नेमकी माहिती मिळणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लक्ष त्या अहवालाकडे लागले असून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूमध्ये बदल व्हायला सुरुवात झाल्यानंतर पालिकेने नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या सुरू केल्या. ११ व्या चाचणीतून मुंबईत ‘एक्सई’ उपप्रकार आढळून आला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. चाचणीत ९९.१३ टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे, एक रुग्ण केपाचा आणि एक रुग्ण एक्सई व्हेरिएंटचा आढळला आहे. मात्र, इंडियन सार्स सीओव्ही २ जिनोमिक कन्सोर्टियम (आयएनएससीओजी) संस्थेने या रुग्णांचे अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नसल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने संबंधित सिक्वेन्सिंगचा डाटा आयएनएसएसीओजी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स (एनआयबीजी)कडे चाचणीसाठी पाठवला आहे.

पालिका सज्ज

आठवडाभरात सिक्वेन्सिंगबाबतचा अहवाल अपेक्षित असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. पालिका सज्ज आहे. योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT