money fraud sakal media
मुंबई

रायगड : बनावट बँक खाते उघडून ८० लाख रुपये लांबविले; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

महाड : कंपनीची सुमारे ८८ लाख रुपयांची रक्कम कंपनीच्या संचालकांच्या संमतीशिवाय बनावट बँक खाते (fake bank account) उघडून स्वतःच्या बँक खात्यात वळती करण्याची घटना (Money fraud) नुकतीच महाडमध्ये घडली. या प्रकरणी तीन भामट्यांसह बँक व्यवस्थापकाविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात (Mahad police station) गुन्हा दाखल करण्यात आला. ए. के. आर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकांनी महाड शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मंगेश शितोळे (रा. तळेगाव, दाभाडे पुणे), प्रथमेश शिगवण (डोंबिवली) आणि नीलेश भारती आणि मानसी शितोळे (तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगेश शितोळे हे या कंपनीमध्ये मुख्य व्यवस्थापक पदावर काम करीत होते. या पदाचा गैरफायदा घेऊन त्यांनी महाड शहरातील आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक प्रथमेश शिगवण यांना नीलेश भारती यांच्या मदतीने बँक खाते उघडण्यासाठी पैसे देऊन कंपनीच्या संचालकांच्या संमतीशिवाय एकेआर कंपनीचे बँक खाते आयडीबीआय बँकेत उघडले.

तसेच कंपनीच्या संचालकांची बनावट कागदपत्रे, स्टेट बँक ऑफ इंडिया व कॅनरा बँकेची बनावट ना हरकत दाखले तयार करून या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे बनावट खाते आयडीबीआय बँकेत उघडले. कंपनीच्या व्यवसायातून मिळालेली ८७ लाख ७९ हजार ५३ रुपयांची रक्कम कंपनी संचालकांच्या परवानगीशिवाय परस्पर या बनावट बँक खात्यामध्ये जमा केली. यानंतर ही रक्कम रोखीने व वैयक्तिक बँक खात्यामध्ये मंगेश, नीलेश व मानसी या तिघांनी परस्पर वळवून काढून घेतली. ७ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला होता.

कंपनीचे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनी मालकांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवलेली होती. यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जानुसार आज रविवारी ६ मार्चला महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT