strike  Sakal media
मुंबई

रायगड : महसूल कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर; जिल्ह्यातील कामकाज ठप्प होणार ?

सकाळ वृत्तसेवा

महाड : दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड (Raigad) जिल्ह्यातील शेकडो महसूल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर (indefinite strike) जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागातील (Revenue department employee) कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी २१ मार्च २०२२ पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत.

तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे. तहसील कार्यालय, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून महसूल सहायक भरतीसाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.

शासन निर्णय महसूल व वन विभाग १० मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता याद्या राज्य स्तरावर एकत्रित करण्याबाबत पत्र काढलेले आहे; परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने पत्र तात्काळ रद्द करावे, अशीही संघटनेची मागणी आहे. इतर मागण्यांबाबत सराकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्‍वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने संपात महाड उपविभागातील कर्मचारी मोठ्या ताकदीने सहभागी होणार असल्याचे महाड उपविभाग अध्यक्ष आर. डी. भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT