मुंबई

रायगड : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्वच्छता जागर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) वतीने म्हसळा तालुक्यात नुकतीच स्वच्छता मोहीम (cleaning campaign) घेण्यात आली. मोहिमेतून १५.२ टनपेक्षा जास्त कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr Appasaheb Dharmadhikari) , डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेमध्ये म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय; तर मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तहसील, पोलिस ठाणे, वनविभाग, कोषागार, सर्कल कार्यालय, एसटी स्टँड, पंचायत समिती म्हसळा, कृषी ऑफिस म्हसळा, सार्वजनिक वाचनालय, पाभरे फाटा, हिंदू स्मशान भूमी स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य यांनी सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली. स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे ४३० सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष असहल कादिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिरडे, पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मेहता, नगरसेवक नशीर मिठागरे, शाहिद जंजिरकर, गटनेते मुन्ना पानसरे, गटनेते संजय कर्णिक, नगर सेवक सरोज म्हशीलकर, मुस्लिम समाज कार्यकर्ते शाबाद घराडे, वसीम कोदरी, नईम दळवी, नगरपंचायत कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता करण्यासाठी ८ वाहने व इतर सर्व साहित्य पुरविण्यात आले होते.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. आजच्या मोहिमेंतर्गत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सकाळपासून शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण शहर स्वच्छ केले आहे. आमच्या स्वच्छतेच्या कार्यात प्रतिष्ठानने केलेली मदत ही आम्हाला पुढे चालना देणारी आहे. अशा कार्यास आमच्या प्रशासनाची वेळोवेळी लागणारी मदत केली जाईल.
- अहसल कादिरी, नगराध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistani Drone: भारत-पाक सीमेवर थरार, सुमारे 25 राउंड फायरिंगनंतर पळाले पाकिस्तानी ड्रोन

Solar Storm: भयंकर सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने; जाणून घ्या काय होणार परिणाम

Tesla Cybertruck : किम कार्दशियनचा ५ वर्षांचा लेकरू चालवतो लाखोंचा टेस्ला सायबर ट्रक..! वाढदिवसानिमित्त मिळाले भन्नाट गिफ्ट

Madhuri Dixit : माधुरीसारखीच सुंदर दिसते तिची मोठी बहीण ! खास सरप्राईजमुळे माधुरीला अश्रू अनावर

Buldana : समृद्धी महामार्गावर सशस्त्र दरोडा ; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना लुटले, अडीच लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर फरार

SCROLL FOR NEXT