Shrirang Barne
Shrirang Barne Sakal media
मुंबई

कर्जतचा कायापालट करणार; खासदार श्रीरंग बारणे यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) माध्यमातून कर्जत मतदारसंघासाठी (Karjat) मोठा निधी आणण्यात खासदार, आमदारांना यश आले आहे. यापुढेही कर्जतच्या विकासासाठी (Developments) भरीव निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang barne) यांनी दिली. ते कर्जत शहरातील मुद्रे येथे भूमिपूजन आणि उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. माजी नगरसेवक संतोष पाटील आणि कर्जत पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून सर्वाधिक निधी कर्जत-खालापूर मतदारसंघात दिला आहे. विकासाला राज्य सरकारचा मोठा हातभार लागला आहे. ज्यांनी सहकार्य केले त्यांना कधीच विसरत नाही. काम करीत असताना कधीच दुजाभाव ठेवला नाही. मुंबई-पुणे या शहरांच्या मध्यवर्ती कर्जत असल्याने या मतदारसंघाला जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

उल्हास नदी, इंद्रायणी नदी, पवन नदीसंदर्भात केंद्र सरकारकडे जलसंवर्धनाबाबत प्रस्ताव पाठवला. तो जर मंजूर झाला, तर नदीसंवर्धनाचे काम मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
कर्जत-पनवेल शटल सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नगरविकास खात्याकडून १०० कोटींचा सर्वाधिक निधी मावळ लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मला प्राप्त झाला आहे, अशी माहिती बारणे यांनी दिली.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माजी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका मधुरा चंदन, पुष्पा दगडे, मनू दांडेकर, संकेत भासे, उमेश गायकवाड, नितीन पाटील, बळवंत घुमरे, बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर, सुवर्णा निलधे, स्वामींनी मांजरे, भारती पालकर, वैशाली मोरे, उद्योजक मोहन ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिपंढरी उभारणार

कर्जत तालुका हा वारकरी संप्रदायाचा असल्याने येथे प्रतिआळंदी उभी राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली. याचबरोबर नदीसंवर्धन प्रकल्पसुद्धा होणार असल्याचे जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT