मुंबई

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने जीएसटी चुकवल्याचे उघड

CD
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने जीएसटी चुकवल्याचे उघड मुंबई, ता. ३१ ः क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्या वझीर-एक्स एक्सचेंजने जीएसटी चुकवल्याचे उघड झाले आहे. सुमारे साडेचाळीस कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे मुंबई (पूर्व) च्या जीएसटी आयुक्तालयाला आढळून आले आहे. या एक्सचेंजच्या व्यवहारांची छाननी करताना ही करचोरी उघड झाली. कर चुकवल्याने दंड आणि व्याजासह ४९ कोटी २० लाख रुपयेही आयुक्तालयाने त्यांच्याकडून वसूल केले. या एक्सचेंजवर शेअर बाजाराप्रमाणेच आभासी चलनाचे (क्रिप्टोकरन्सी) व्यवहार होतात. शेअर खरेदी विक्री प्रमाणेच खरेदीदार आणि विक्री करणारा या दोघांकडूनही दलाली (कमिशन) घेतली जाते. या व्यवहारांपैकी फक्त काही जमा रकमेवरच जीएसटी भरला जात होता. अन्य व्यवहारांवर करभरणा होत नव्हता, असे आढळून आले. या व्यवहारांवरील शुल्कावर १८ टक्के दराने जीएसटी देय आहे. सध्या जीएसटी आयुक्तालयातर्फे ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंग आदी व्यवहारांची तपासणी केली जात आहे. मुंबई विभागातील सर्व क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या व्यवहारांची तपासणी केली जाईल, अशी माहिती मुंबईच्या जीएसटी आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT