मुंबई

नववर्ष निर्बंध बातमी

CD
रोषणाईच्या झगमगाटाने मुंबईकर तृप्त सकाळ वृत्तसेवा कोविडच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी नववर्षाचे स्वागत मुंबईकरांना घरात बसूनच करावे लागले. परंतु नववर्षानिमित्त वांद्रे-वरळी सागरी सेतूवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने या स्वागताला चार चाँद लावले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या रोषणाईने मुंबईकरांना घरबसल्या तृप्त केले. सलग दुसऱ्या वर्षी कडेकोट निर्बंधात मुंबईमध्ये नववर्षाचे स्वागत झाले. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबईत फटाक्यांची मोठी आतषबाजी होते. मात्र, गेल्या दोन वर्ष निर्बंधांमुळे आतषबाजी कमी झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. १) नववर्षाचे स्वागत मुंबईकरांना घरात बसूनच करावे लागले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरही नागरिकांना जमण्यास मज्जाव करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळनंतर पोलिसांनी सर्व पर्यटन स्थळे बंद केली. २) गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन, गिरगाव चौपाटी या परिसरात पर्यटक नगण्य होते. जुहू चौपाटीवरही अशीच परिस्थिती होती. या चौपाटीवर काही प्रमाणात नागरिक येत होते; मात्र त्यांना तेथे थांबण्यास मज्जाव केला जात होता. तर गिरगाव चौपाटीवर पोलिसांकडून प्रवेश नाकारला जात होता. ३) यंदा थर्टीफर्स्टला `तिखटा`चा वार असल्याने घरातच चिकन-मटण-मच्छीवर ताव मारण्यात आला. तर, तरुणांच्या पार्ट्याा मित्र मंडळीच्या रिकाम्या घरात अन्यथा इमारतींच्या गच्चीवर रंगल्या होत्या. तर, संसारी मंडळींनी बच्चेकंपनीबरोबरच घरातच थर्टीफर्स्टचा बार उडवला. ---- संबंधित वृत्त पान ४ वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT