मुंबई

शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही तेजी

CD
शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही तेजी सेन्सेक्समध्ये ६७२ अंशांची; तर निफ्टीत १७९ अंशांची वाढ नवी दिल्ली, ता. ४ ः आज शेअर बाजारातील वाढ सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सेन्सेक्स ६७२ अंशांच्या वाढीबरोबर ५९,८५५ वर स्थिरावला; तर निफ्टी १७९ अंशांनी वाढून १७,८०५ वर बंद झाला. दोन दिवसांत सेन्सेक्सची १६०० अंशांनी वाढ झाली आहे. आज सेन्सेक्सने १६० अंशांच्या वाढीबरोबर ५९,३४३ अशी सुरुवात केली होती. दिवसभरात सेन्सेक्सने ५९,९३७ चा उच्चांकी; तर ५९,०८४ चा निचांकी स्तर गाठला. सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त सहा शेअर्समध्ये घसरण झाली; तर २४ स्टॉक वाढीसह बंद झाले. पॉवरग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, टायटन, रिलायन्स, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये वाढ झाली. याबरोबरच बजाज फिनसर्व, आयटीसी, अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि नेस्ले या शेअर्सनीसुद्धा वाढ नोंदवली. तर इन्फोसिस, डॉ. रेड्डी, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ही घसरण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. सेन्सेक्सचे अप्पर सर्किट ५७६ आणि लोअर सर्किट २२६ नोंदवण्यात आले. म्हणजे एका दिवसात सेन्सेक्सची वाढ यापेक्षा जास्त किंवा कमी होणार नाही. आज लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप २७१.३७ लाख कोटी इतका नोंदवण्यात आला. दरम्यान, निफ्टी १७९ अंशांनी वाढून १७,८०५ वर बंद झाला. दिवसभरात निफ्टीच्या शेअर्सनी १७,८२६ चा उच्चांकी; तर १७,५९३ चा निचांकी स्तर गाठला. निफ्टीच्या ५० पैकी ३५ शेअर्समध्ये वाढ; तर १५ शेअर्समध्ये घट झाली. एनटीपीस, पॉवरग्रीड, महिंद्र अँड महिंद्र, ओएनजीसी या शेअर्समध्ये वाढ झाली; तर टाटा मोटर्स, कोल इंडिया, विप्रो या शेअर्समध्ये घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT