मुंबई

मुंबईची चिंता वाढतेय !

CD
चार प्रभाग कोरोना ‘हॉटस्पॉट’ २७ डिसेंबरपासून आकडा वाढला; रुग्णसंख्या चार हजाराच्या पार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता मुंबईत धाकधूक वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईतील एकूण चार प्रभाग कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत. के पश्चिम, एच पश्चिम, के पूर्व आणि डी या चार प्रभागांमध्ये इतर प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. के पश्चिम विभागात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. हा आलेख २७ डिसेंबरपासून पुन्हा वाढला असून तेव्हापासूनच प्रभागामध्ये ३५० च्या पुढे रुग्णसंख्या झाली आहे. आता १० दिवसांत ही संख्या वाढून थेट ४ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यानुसार, खाटाही भरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. पण, आयसीयू आणि ऑक्सिजन खाटांचा वापर अद्याप कमी असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ भागात अंधेरी आणि विलेपार्लेमध्ये दुसऱ्या लाटेपासून सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. वांद्रे पश्चिम आणि जी दक्षिण प्रभागामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. के पश्चिम प्रभागापाठोपाठ, एच पश्चिम हा प्रभागही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. २७ डिसेंबरदरम्यान या प्रभागात २५२ सक्रिय रुग्ण होते. आता ही संख्या वाढून तीन हजार ७४४ वर पोहोचली आहे. डी प्रभागात आतापर्यंत २,५५८ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे; तर के पूर्वमध्ये २,६०६ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या ८ दिवसांपासून दुपटीने रुग्ण आढळत आहेत. सोमवारीही (ता. ३) आठ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबईत ३५० ते ५०० च्या दरम्यान रुग्ण सापडत होते. मुंबईत बी आणि सी हे दोन प्रभाग वगळता इतर प्रभागांतही ५०० ते १००० च्या वर सक्रिय रुग्ण नोंदले गेले आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले प्रभाग के पश्चिम -  ४,५६४ एच पश्चिम - ३,७४४ डी - २,५५८ के पूर्व - २,६०६ एच पूर्व -१,७६२ एफ दक्षिण - १,७६१ सर्वाधिक मृत्यू झालेले प्रभाग के पूर्व - १,२८३ पी दक्षिण - १,०५१ आर सी ९८८ पी उत्तर - ९७६ आर एस - ८८८ के पश्चिम - ८०७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT