मुंबई

केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास

CD
केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास स्वच्छता मोहिमेत दुर्भप्रेमींचा सहभाग वसई, ता. ४ (बातमीदार ) ः माहीम केळवे भुईकोटच्या विजयदिनाचे २८४ वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने केळवे भुईकोटचे संवर्धन व्हावे, याकरिता किल्ले वसई परिवाराने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत केळवे कस्टम कोटची स्वच्छता करण्यात आली. या वेळी दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता. या भुईकोटाचे मुख्य प्रवेशद्वार हे ७.५० फूट उंचीचे आहे. येथील इतिहास पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा, संवर्धन जतन करता यावे, याकरिता अनेक सामाजिक संस्था मोहीम राबवित असतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या या भुईकोटाची स्वच्छता राखण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढच्या मोहिमेत केळवे कोट दारूबंदी, प्रवेशद्वार सुशोभीकरण, माहिती फलक लावणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या केळवे भुईकोटच्या आतील जमा झालेली वाळू उपसण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ, महिला आदींनी यात सहभाग घेतला. विजयदिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेने भुईकोटाला मोकळा श्वास मिळवून दिला आहे. ------------------------------------ नियोजनबद्ध काम करण्यासाठी इतर काही संस्थांना आपला सहभाग नोंदवायचा असेल, तर त्यांनी किल्ले वसई मोहीम परिवार, संवर्धन मोहीम केळवे, केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ यांना संपर्क करावा, असे आवाहनदेखील या वेळी इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT