मुंबई

बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा आरोप

CD
बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप फेलोशिप नाही! बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा आरोप मुंबई, ता. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संशोधक विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. २०१९ व २०२० या वर्षाची फेलोशिप संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप देण्यात आलेली नसून २०२१ करिता अजूनपर्यंत प्रक्रियाही सुरू केलेली नाही असे पार्टीने म्हटले आहे. दरम्यान, बार्टीने सोशालिस्ट पार्टीचा आरोप खोडून काढला आहे. याविषयीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुढील तीन दिवसांत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती बार्टीने दिली. राज्यात सारथी व महाज्योती संशोधन फेलोशिपसाठी २०२१ मध्ये ७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. महाज्योतीसाठी २०२१ करिता जवळपास ७०० च्या दरम्यान सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली; मात्र त्या तुलनेत बार्टीतर्फे सर्वच अर्जदारांस फेलोशिप देण्याऐवजी मर्यादित संख्येने फेलोशिप दिली जात आहे. याची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी आज केली. बार्टीअंतर्गत संशोधक फेलोशिपकरिता १९ डिसेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा झाली. ५५४ अर्जदारांपैकी ५१७ जणांना गेल्या तीन दिवसांत मुलाखतीकरिता बोलावण्यात आले होते. त्यात ३८० हे पीएच. डी. पदवीधारक असून इतर एम. फिल.धारक विद्यार्थी आहेत. म्हणून या सर्वांनाच (एकूण ५१७ विद्यार्थी) सारथी, महाज्योतीप्रमाणे फेलोशिप द्यावी, अशी मागणी डॉ. माने यांनी केली. --- कोट... २०१९-२० वर्षाकरिता विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी मागील महिन्यात लेखी परीक्षा झाली आहे. त्यातील काहींच्या मुलाखतीही सुरू असून पुढील तीन दिवसांत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. फेलोशिप गुणवत्तेवर आधारित मिळावी यासाठी प्राथमिकता दिली जात आहे; मात्र गुणवत्ता डावलून आणि केवळ फेलोशिप हवी म्हणून अधिक उमेदवारांनी मागणी केल्यास इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप उपलब्ध करून देणे शक्य नाही. - धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT