Corona Bed
Corona Bed sakal media
मुंबई

...तर खासगी रुग्णालयाची मान्यता होणार रद्द

CD

भाईंदर : मुंबईप्रमाणेच मिरा-भाईंदरमध्ये (Mira-bhayandar) कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या शहरात साडेतीन हजारांच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ३,५१३ रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्ण लक्षणे नसल्यामुळे (no symptoms) घरातच आहे. रुग्णालयात केवळ ५०३ रुग्णच रुग्णालयात दाखल असल्यामुळे महापालिका आणि खासगी रुग्णालयातील (Private hospitals) अवघ्या १५ टक्के खाटाच रुग्णांनी भरलेल्या आहेत; तर ८५ टक्के खाटा रिक्त आहेत. (Eighty five percent beds vacant in municipal and private hospitals)

दरम्यान ज्यांना सौम्य लक्षणे आहेत किंवा मनात भीती आहे, असेच रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. असे असतानाही काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णाला आवश्यकता नसतानाही ऑक्सिजन लावत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महापालिकेने आक्रमक भूमिका घेत अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. १ जानेवारीपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल १,०७२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेत एका दिवसात कमाल ५५५ रुग्ण आढळून आले होते. रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी रुग्णांपैकीदेखील बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणे असलेले किंवा ज्यांना घरी रहाणे शक्य नसलेले किंवा कोरोनाची भीती वाटणारे रुग्ण आहेत.

असे असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना गरज नसतानाही ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती महापालिकेला मिळाली आहे. याची गंभीर नोंद आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व खासगी रुग्णालयांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या कोरोना रुग्णाला खरोखरच ऑक्सिजनची गरज आहे का, याची खातरजमा करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या तपासणीत कोणत्याही रुग्णाला विनाकारण ऑक्सिजन लावण्यात आले असल्याचे आढळले, तर त्या रुग्णालयाची नोंदणी तातडीने रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. दृष्टिक्षेपात उपलब्ध खाटा - ३३२८ ऑक्सिजनयुक्त खाटा - १३९९ अतिदक्षता विभागातील खाटा - ४०० व्हेंटिलेटर खाटा - १७१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT