Corona patients sakal media
मुंबई

कोरोना रुग्ण वाढले तरी वसई-विरारमध्ये इमारतींना सील नाही

CD

वसई : कोरोनाबाधितांची (corona patients) आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असली तरी इमारती सील न करण्याचा निर्णय (building not sealed) वसई-विरार महापालिकेने (vasai-virar municipal corporation) घेतला आहे. नागरिकांनी तरीही नियमांचे पालन आवश्‍य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी केले आहे. वसई-विरार पालिका क्षेत्रात पाच हजार ३२२ कोरोनाबाधित विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत चार रुग्णालये तसेच कोविड केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. (corona patients increases in vasai-virar but building not sealed)

जर कोणाला लक्षणे वाटली, तर कोरोना चाचणी केली जात आहे. प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरेसा साठाही सज्ज ठेवला आहे. दरम्यान, गृहसंकुल सील न करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना घरी सात दिवस क्वारंटाईन बंधनकारक केले आहे.

"ज्या इमारतीत असे रुग्ण आढळतील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. इमारती सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु रहिवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, आपल्या आरोग्याची हेळसांड होऊ नये याकरिता काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे."

- अजिंक्य बगाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT