मुंबई

लोकलवर केलेल्या दगडफेकीत महिला प्रवाशी जखमी

CD
लोकलवर केलेल्या दगडफेकीत महिला प्रवासी जखमी दगडफेक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू नवी मुंबई, ता. ९ ( वार्ताहर ) : हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ ते जुईनगर रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने धावत्या लोकलवर दगडफेक केल्याची घटना रविवारी (ता. ९) घडली. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणारी एक महिला जखमी झाली आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या मधुरा भोसले (४६) या नेरूळ सेक्टर -८ मध्ये कुटुंबासह राहण्यास असून त्या ऐरोलीतील एका आयटी कंपनीत कामाला आहेत. २ जानेवारी रोजी मधुरा भोसले यांनी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी नेरूळ रेल्वेस्थानकातून लोकल पकडली होती. सदरची लोकल नेरूळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकादरम्यान आली असताना, अज्ञात व्यक्तीने या लोकलवर दगड भिरकावला. सदरचा दगड लोकलमधील महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या मधुरा भोसले यांच्या डोळ्याच्या खाली गालावर लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यामुळे लोकलमधील महिला प्रवाशांनी त्यांना जुईनगर रेल्वेस्थानकात उतरवून त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांना याबाबतची माहिती दिली. आरपीएफच्या जवानांनी मधुरा भोसले यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना जुईनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारातून बरे झाल्यानंतर मधुरा भोसले यांनी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT