culprit arrested
culprit arrested sakal media
मुंबई

मुंबई : अल्पवयीन कुमारी मातेसह आरोपीस अटक

CD

घाटकोपर : घाटकोपर पूर्वेतील कामराज नगरमध्ये राहणाऱ्या अपहृत अल्पवयीन कुमारी मातेची तिच्या ६ महिन्यांच्या बाळासह सुटका करून तिच्या पतीला पंतनगर पोलिसांनी (culprit arrested in madhya pradesh) मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. ही अल्पवयीन मुलगी १५ वर्षे ६ महिन्यांची असून, तिला झालेले बाळ हे ६ महिन्यांचे आहे. या मुलीचे अपहरण (Minor girl abduction) झाल्याबाबत या मुलीची मामेबहीण यांनी ११ फेब्रुवारी २०२० ला पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (A man held at madhya pradesh in minor girl abduction crime )

घाटकोपर भागातील एमजी रोडवरील राजश्री पॅलेस या ठिकाणी ही मुलगी घरकाम करत होती; तर या ठिकाणी बिल्डिंगचा सुरक्षारक्षक हा मुलगी बेपत्ता झाल्यापासून गायब झाला होता. त्याच्यावर संशयाची सुई गेल्यावर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. अपहृत मुलीसह गायब तरुणाच्या मोबाईल फोनचे एसडीआर/सीडीआरबाबत तांत्रिक तपास केला. त्यात त्यांचे लोकेशन हे पॉवर हाऊस, भांडोर रोड दतिया, मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे समजले.

त्यानुसार महिला अधिकारी पौर्णिमा हांडे, यांच्यासह अमलदार पुरुषोत्तम महाजन, मोहिनी कुरकुटे यांचे पथक ६ जानेवारीला त्या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने या मुलीस तिच्या बाळसह, आरोपी यांना ताब्यात घेतले. आज त्यांना पंतनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT