मुंबई

राज्य अतिथींच्या मोटारींचा जीटीएस नियंत्रकांकडून गैरवापर

CD
राज्य अतिथींच्या मोटारींचा खासगी वापर जीटीएस नियंत्रकांकडूनच गैरप्रकार प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.१० : राजशिष्टाचारासाठी राखीव असलेल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या संमतीने राज्य अतिथींसाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारींचा जीटीएस नियंत्रकांकडूनच खासगी कामासाठी वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तत्कालीन जीटीएस नियंत्रक किशोर गायकर यांच्या कार्यकाळात शासकीय परिवहन सेवेत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप जीटीएस वाहनचालक संघटनेकडून करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचारांतर्गत शासकीय परिवहन सेवा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी, राज्य अतिथी तसेच इतर मान्यवरांसाठी जून २०२१ मध्ये ६३ वाहनांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये ६१ डीव्ही मोटारी, एक टोइंग व्हॅन, एक बस, असे एकूण ६३ वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी १५ विविध प्रकारच्या पदांसाठी वाहनांची मंजुरी मिळाली आहे; मात्र यामध्ये कुठेही जीटीएस नियंत्रकांसाठी डीव्ही मोटार मंजूर नाही. तरीही गायकर यांनी राज्य अतिथींसाठी राखीव असलेल्या वाहनांचा सर्रास वापर केला आहे. यासंबंधित शासकीय परिवहन सेवेतील वाहनाच्या लॉग बुकमधील नोंदी ‘सकाळ’च्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये जीटीएस नियंत्रकांच्या नावावर डीव्ही मोटार देण्यात आल्याच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे राज्य अतिथींच्या वाहनांमध्ये नव्याऐवजी जुने सुटे भाग लावून लाखो रुपये लाटल्यानंतर गायकर यांच्याकडून ही वाहने गैरप्रकारे वापरल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, शासकीय परिवहन सेवेच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आणि तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ------ कारवाईकडे प्रशासनाचा कानाडोळा तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांच्या गैरकारभाराबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रशासनाला वाहनाच्या लॉग बुकमधील नोंदी आणि इतर भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले आहेत; मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे जीटीएस विभागातील कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. ------------- चौकशी प्रलंबित शासकीय परिवहन सेवा विभागातील जीटीएस वाहन चालकांच्या तक्रारीवरून सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अशोक साळवे यांनी विद्यमान नियंत्रकांना एक डिसेंबरला चौकशीचे आदेश दिले आहेत; मात्र अद्याप चौकशी सुरूच झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कोट गैरप्रकाराबाबत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र देण्यात आले आहे. माझ्या नजरेत अजून याबाबतीत पत्र आलेले नाही. असे निवेदन माझ्या कार्यालयाला आले असल्यास दोषींविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. - अदिती तटकरे, राज्यमंत्री, राजशिष्टाचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT