मुंबई

मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली ‘लटकली’

CD
मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली ‘लटकली’ आठ वर्षांनंतरही काम ठप्पच; नवीन कंत्राटदार नेमणार सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. १२ ः धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर १० वर्षांपूर्वी गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प अजूनही लटकलेलाच आहे. भाविकांना तसेच पर्यटकांना अवघ्या पाच मिनिटांत पोहोचवणारा देशातील हा पहिला प्रकल्प मलंगडावर उभारण्यात येणार होता; मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे या प्रकल्पाची रखडपट्टी सुरूच असून आता हे काम मार्गी लावण्यासाठी नवीन ‘सक्षम’ कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र त्यासाठीही आणखी काही वर्षे लोटणार असल्याने सध्या तरी मलंगगडावरील तीन हजार ६०० पायऱ्या चढण्याशिवाय पर्याय नाही. वनखात्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक परवानग्यांचे सोपस्कार पार केल्यानंतर मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉली उभारण्याच्या प्रकल्पाला २०१२ मध्ये सुरुवात झाली. गडावर ११७४ मीटर लांबीचे रूळ उभारून ट्रॅलीच्या स्वरूपात रेल्वे चालवण्याचा त्या वेळी देशातील हा पहिलाच प्रकल्प होता. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे गडावर पोहोचण्यासाठी चढाव्या लागणाऱ्या तीन हजार ६०० पायऱ्यांची कसरत थांबणार होती; तर अडीच तासांचा हा प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार होता. त्यामुळे दोन वर्षे या प्रकल्पाचे काम वेगात सुरू होते. २०१४ पर्यंत ट्रॉलीचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचा मानस होता. त्यासाठी रूळ उभारण्यापासून ते ट्रॉली बनवण्यापर्यंतची ८० टक्के कामेही पूर्ण झाल्याने मलंगगडाच्या पर्यटनाला व विकासाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत होईल, अशी अपेक्षा होती, पण पुढे कंत्राटदाराने काम थांबवल्याने गेल्या आठ वर्षांपासून हे काम रखडले आहे. मलंगगड परिसरातील रामा ८५ ते आंबे रस्त्यावर लहान पूल बांधणी, उसाटणे पाली चिरड ते हजीमा १७६ रस्ता तयार करणे, मलंगगडावर पायऱ्या बांधणे, सुरक्षा रेलिंग तयार करणे यांसारख्या सुमारे १५ कोटी २२ लाख रुपये निधीच्या विकासकामांचा प्रारंभ मंगळवारी (ता. ११) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अनेक वर्षे रखडलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचा आढावाही घेण्यात आला. नवीन कंत्राटदार नेमणार फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले, ते हा प्रकल्प चांगल्या प्रकारे हाताळू शकले नाहीत; तर सब कंत्राटदार जो फ्युनिक्युलर बनवतो त्याला थेट बिल देता येणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प खूप वर्षांपासून रखडला आहे. वारंवार बैठका घेतल्या, कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही झाले नाही. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा कंत्राटदार काम पूर्ण करू शकत नसल्याने त्याचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन कंत्राटदारास हे काम दिले जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. यासाठी १० ते १५ कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रकल्पाची रूपरेषा फ्युनिक्युलर ट्रॉलीसाठी ११७४ मीटर लांबीचे रुळ टाकण्यासाठी सुमो १०० काँक्रीटचे खांब अभारण्यात येणार होते. गडाच्या पायथ्याशी तसेच माथ्यावर दोन स्थानके नियोजित आहेत. खाली आणि वर प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रत्येकी दोन अशा चार ट्रॉलींची व्यवस्था करण्यात येणार होती. एका ट्रॉलीमध्ये एका वेळी ६० प्रवासी वाहतूक करतील, तसेच एक टन सामानाची वाहतूक होईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी रूळ मार्गांना समांतर ११७४ मीटरची शिडीही उभारण्यात येणार आहे. ट्रालीच्या माध्यमातून गड सर करत असताना डोंगराची सफरही यानिमित्ताने पर्यटकांना घडणार आहे. ...या कामांना सुरुवात - हाजीमलंगवाडी ते फ्युनिक्युलर लोअर ट्रॉलीपर्यंतचा चारपदरी रस्ता निधी : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९.५० कोटी मंजूर बक्तारशाह बाबा दर्ग्यापासून श्रीमलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला घडीव दगडाच्या खांडकी पेव्हिंगद्वारे पायऱ्या आणि सुरक्षा रेलिंग उभारणे निधी : पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांतून एक कोटी अनुदान अंबरनाथ तालुक्यातील आंबे रस्त्यावर साकव उभारणे निधी : ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५७ लाख मंजूर उसाटणे बुर्दुल ते नार्हेन- पाली- चिरड- शेलारपाडा रस्ता निधी : पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून चार कोटी ६५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT