Mhada Exam
Mhada Exam Sakal Digital
मुंबई

म्हाडा भरती परीक्षेत गोंधळ घालणारी कंपनी काळ्या यादीत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : सरळसेवा भरती परीक्षेचे काम देण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा कट रचल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. तेव्हा परीक्षा रद्द करावी लागल्याने म्हाडाची प्रतिमा डागाळली होती. उमेदवारांनाही त्रास सहन करावा लागला होता. या प्रकरणी म्हाडाने संबंधित जीए सॉफ्टवेअर कंपनीने गोपनीयतेचा भंग केल्याने तिला काळ्या यादीत टाकावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. (Mhada exam paper leak)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध १४ संवर्गांतील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने निवड केलेल्या कंपन्यांपैकी ‘जीए सॉफ्टवेअर’ची म्हाडाने नेमणूक केली. मात्र, पेपर फोडण्याचा कट रचल्याने म्हाडाने तिला काळ्या यादीत टाकण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

कंपनीकडून शुल्क वसुली करारानुसार म्हाडाने परीक्षेच्या कामासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला २० टक्के रक्कम दिली. मात्र आता म्हाडाने ती रक्कम परत करण्यास सांगितले आहे. करारानुसार कंपनीकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT