TCS Office
TCS Office 
मुंबई

TCS शेअरची पुनर्खरेदी ४५०० रुपयांमध्ये करणार

CD

टीसीएस शेअरची पुनर्खरेदी ४५०० रुपयांमध्ये करणार

नवी दिल्ली, ता. १२ (पीटीआय) : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसतर्फे भागधारकांकडून शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) करण्याची घोषणा झाली आहे. यासाठी टीसीएसतर्फे भागधारकांना प्रत्येक शेअरमागे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत. (TCS announces its share buyback)

गुरुवारी मुंबई शेअर बाजारावर या शेअरचा भाव ३ हजार ८९७ रुपये होता. बुधवारी (ता. १२) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेअर बायबॅक योजनेमध्ये कंपनीतर्फे भागधारकांच्या विशिष्ट संख्येतील शेअरची खरेदी केली जाते. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२.२ टक्के वाढ होऊन तो ९,७६९ कोटी रुपये झाल्याचे जाहीर करण्यात आले. याच बैठकीत बायबॅकची घोषणा करण्यात आली. या बायबॅकसाठी टीसीएसने अठरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (Share Market IT stocks update)

२०२० या वर्षीच्या याच तिमाहीत टीसीएसला ८,७०१ कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. २०२० या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला ४२ हजार १५ कोटी रुपये महसूल मिळाला होता. २०२१ च्या याच तिमाहीत त्यात १६.३ टक्के वाढ होऊन तो ४८ हजार ८८५ कोटी रुपये एवढा झाला, असे सीईओ राजेश गोपीनाथन म्हणाले. यावेळी कंपनीतर्फे प्रत्येक शेअरमागे सात रुपयांचा लाभांशही (डिव्हीडंड) जाहीर करण्यात आला. ज्या भागधारकांकडे २० जानेवारी या रेकॉर्ड डेटला टीसीएसचे शेअर असतील त्यांना सात फेब्रुवारी रोजी हा लाभांश मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT