मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) वेगाने पसरली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडल्यानंतर मुंबईतील गर्भवती महिला (Pregnant woman) कोविडच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सापडू लागल्या आहेत. पालिकेच्या केईएम रुग्णालयातील ४०, नायर रुग्णालयातील ७१ महिलांना आणि सायन रुग्णालयातील जवळपास १० गर्भवतींना कोरोनाचा संसर्ग (corona infection) झाला आहे. (corona infected Pregnant woman patients increases in corona third wave)
रुग्णालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली असून या लाटेतही गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत, असे पालिका रुग्णालयांचे प्रमुख डाॅ. रमेश भारमल यांनी सांगितले. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. संगीता रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लीच रुग्णालयात मॅटर्निटी वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. त्यात विशेषतः कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींना दाखल करून घेतले जात आहे. अशा ४० ते ४५ गर्भवतींवर दाखल असून त्यातील काहींची प्रसूती झाली आहे, पण त्यांच्यापासून बाळाला संसर्ग होत नाही.
प्रत्येक विभागात उपचारांसाठी येणाऱ्या गर्भवतींना लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला जातो, पण महिला अजूनही धजावत नाहीत. तिन्ही रुग्णालयांत विशेष वॉर्ड- नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पालिकेच्या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये मॅटर्निटी वाॅर्ड सुरू केला गेला आहे. आधी सर्व गर्भवती प्रसूती किंवा उपचारांसाठी नायरमध्ये यायच्या. आता त्यांना इतर ठिकाणीही उपचार मिळतील. नायरमध्ये ही ७१ गर्भवती महिला दाखल आहेत. लसीकरण महत्वाचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्भवतींनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे, मात्र अजूनही महिलांमध्ये लसीकरणासंबंधित गैरसमज आहेत, असे मुंबई जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी साांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.