gold robbery sakal media
मुंबई

नवी मुंबई : उलवेमध्ये ९ लाख ६० हजाराच्या दागिन्यांची लुट

एनआरआय पोलिसांकडून सात ते आठ हल्लेखोरांचा शोध सुरू

CD

नवी मुंबई : उलवे सेक्टर-२३ मध्ये राहणारे रोशन शिरवडकर याच्यावर ७ ते ८ व्यक्तींनी हॉकी स्‍टिक व बांबूने हल्ला करून कारमधील ९ लाख ६० हजारांचे दागिने लुबाडल्‍याची (gold robbery) घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी (NRI police) गुन्हा दाखल (Police Fir) केला आहे. जखमी रोशन शिवडकर (३४) हा उलवे सेक्टर-२३ मध्ये कुटुंबासह राहतो. गत रविवारी सायंकाळी तो उरण राहत असलेल्‍या आईला भेटण्यासाठी गेला होता. (Gold robbery in ulave navi mumbai police filed a complaint against culprit)

रात्री पावणे दहाच्या सुमारास कारने उलवेतील घरी परतत होता. यावेळी राहत असलेल्‍या इमारतीखाली आला असता, पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा कारमधून आलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी रोशनला हॉकी स्टिक व बांबूने हल्ला केला.

त्‍याच्या कारच्या काचा फोडल्या. यावेळी एकाने रोशनवर रिव्हॉल्‍वर रोखून जीवे मारण्याची धमकी देत कारमध्ये असलेले ९ लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी व एक ब्रेसलेट लुटले. रोशनने आरडाओरड केल्याने रहिवासी बाहेर येताच हल्लेखोरांनी पळाले. गंभीर जखमी रोशनवर बेलापूर येथील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT