corporator fund sakal media
मुंबई

नगरसेवकांची आयडीयाची कल्पना; धारावीतील नगरसेवकांकडून निधीची उधळपट्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मतदारांना दिलेली आश्‍वासने पाळण्यासाठी दादरच्या नगरसेवकांनी (corporator) अनोखी कल्पना लढवली आहे. नगरसेवक निधीतून (corporate fund) खासगी इमारत परिसरात विकासकामे, सीसीटीव्ही (cctv) लावता येत नाहीत, पण इमारतीच्या बाहेरील परिसरात हे कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. धारावीतील मक्कुनी थावलापील, मरीअम्मल थेवर हे शिवसेनेचे (shivsena) आणि रेश्‍माबानो खान या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) नगरसेविकेने ही कल्पना लढवली आहे. ‘या परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही स्थानिकांकडून मागणी होत होती.

त्यामुळे नगरसेवक निधीतून हे सीसीटीव्ही लावण्यात येतील, असे थेवर यांनी सांगितले. महानगरपालिकेने धारावीत सीसीटीव्ही लावण्यासाठी चार निविदा मागवल्या आहेत; तर या परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा उपाय केला जात आहे, असे पालिकेच्या जी उत्तर प्रभागातून सांगण्यात आले. चौकट नगरसेवक निधीतून पिशव्या आणि साड्याही यापूर्वी पालिकेने नगरसेवक निधीतून मतदारांना देण्यासाठी तागाच्या, कापडांच्या पिशव्या, विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले आहेत.

त्याचबरोबर गरजू महिलांना साड्या देण्यासाठीही नगरसेविका निधी राखून ठेवला आहे. कुर्ला परिसरातील नगरसेवकांनी ही योजना आणली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू महिलांना शिलाई मशीन देण्यासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. धारावी येथे लागणार सीसीटीव्ही मदिना नगर, सेठवाडी, अण्णा नगर, धोबीघाट ब्रिज, कुंभारवाडा पहिला आणि चौथा, नेताजी सोसायटी, सूर्योदय सोसायटी, राजीव इंदिरा चाळ, पीव्ही चाळ, थेवर अपार्टमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT