High-Court-Mumbai sakal media
मुंबई

फसवणूक प्रकरणाचा निकाल देण्यास २३ वर्षे; दोन कोटींचा परतावा देण्याचे आदेश

सुनिता महामुनकर

मुंबई : फसवणुकीचा आरोप (fraud case allegation) असलेल्या एका प्रकरणाचा निकाल लावण्यात तब्बल २३ वर्षे लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) सीमा शुल्क विभागाला दोन कोटी रुपयांचा परतावा याचिकादाराला (Petitioner) करण्याचे आदेश दिले. ‘सुशीटेक्स एक्स्पोर्ट इंडिया लिमिटेड’ वर फॅब्रिक निर्यातीत सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सीमा शुल्क विभागाने (customs department) लावला होता. याबाबत वसुलीची नोटीसही कंपनीला बजावण्यात आली होती. कंपनीने यापैकी दोन कोटी रुपये जमा केले आणि प्रकरणाबाबत विभागाकडे तक्रार दाखल केली.

मात्र, या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ विभागाने घेतला. याबाबत कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने एवढ्या प्रदीर्घ कालावधीबाबत नाराजी व्यक्त केली. प्रकरण किती वेळेत निकाली काढावे, यावर कस्टम विभाग ठरवू शकते. मात्र, त्यासाठी दोन दशकांइतका अवाजवी वेळही असू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच याचिकादार कंपनीने जमा केलेले दोन कोटी रुपये सव्याज परत करण्याचे आदेशही न्यायालयाने विभागाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT