High-Court-Mumbai sakal media
मुंबई

आरोपीची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टानं केली रद्दबातल; नोंदवलं महत्वाचं निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : श्रीवर्धन येथील महिलेची हत्या (shrivardhan woman murder) केल्याच्या आरोपात माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा (sentenced to life imprisonment) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) रद्दबातल केली. पोलिसांनी ठेवलेल्या त्रुटींमुळे तपासात विश्वासार्हता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. श्रीवर्धन येथील सावित्री सागर पवार यांची ७ फेब्रुवारी २०१७ मध्ये हत्या झाली होती. पोलिसांनी या आरोपात गणेश मांडवकर आणि मंगेश जाधव यांना अटक केली आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.

माणगाव सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात आला आणि आरोपींना न्यायालयाने जनमठेपेची शिक्षा सुनावली. यात अभियोग पक्षाने सहा साक्षीदारांची जबानी नोंदविली. यात सहा वर्षांच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण होती. मात्र, पोलिसांनी साक्षीदाराच्या आईची जबानी नोंदविली नाही. जिला साक्षीदाराने या घटनेची माहिती दिली होती. तसेच ज्यांनी प्रथम मृतदेह पाहिला त्या साक्षीदारांची साक्षही पोलिसांनी घेतली नाही, त्यामुळे अल्पवयीन साक्षीदाराच्या जबानीला बळकटी येत नाही, असे निरीक्षण न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने नोंदविले.

पोलिसांनी अल्पवयीन साक्षीदाराची जबानी घटनेनंतर २३ दिवसांनी नोंदविली. यादरम्यान त्याला कोणी पढवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही खंडपीठ म्हणाले. आरोपी मांडवकर महिलेचा भाऊ होता, असे अल्पवयीन साक्षीदाराने सांगितले आहे, त्यामुळे या हत्येमागील हेतू स्पष्ट होत नाही. तपासातील विसंगतीमुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा पुरेशा कायदेशीर आधारांवर दिलेली नाही, असे म्हणत न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रद्दबातल केली. सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये जन्मठेपेची सजा सुनावली होती.

शिक्षा भोगत असताना आरोपी मंगेशचा कारागृहात मृत्यू झाला. मांडवकरच्या वतीने सातपुते यांनी बाजू मांडली. ॲड. आशिष सातपुते यांनी न्यायालयात आरोपींच्या वतीने बाजू मांडली. सहा वर्षांच्या अल्पवयीन साक्षीदाराची प्रत्यक्षदर्शी साक्ष ही सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय पुरावा कायद्याच्या न्यायतत्त्वानुसार विश्वासार्ह नसून फक्त या पुराव्यांवर आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावणे प्रचलित न्यायतत्त्वानुसार अयोग्य आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT