अल्पवयीनकडून कार चोरी
भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : कल्याणमध्ये जाण्यासाठी अल्पवयीन मुलाने ऑनलाईन टॅक्सी बुक केली होती. वाटेत लघुशंका झाल्याचे सांगताच चालकाने कार थांबविली. चालकही कारमधून उतरल्याचे पाहताच त्या मुलाने चालकाला ढकलून कार पळवून नेली होती. पोलिस तक्रारीनंतर २४ तासांत या मुलाला ताब्यात घेण्यात आले.
घणसोली येथे राहणारे नितीन पडवळ हे कार चालवून उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता. ३०) पहाटे ठाणे शहरातील जांभळी नाका येथून कल्याणमध्ये जाण्यासाठी एका प्रवाशाने टॅक्सी बुक केली होती. भिवंडीजवळील पिंपळास फाटा येथे कार येताच प्रवाशाने लघुशंका आल्याचे सांगत कार थांबविण्यास भाग पाडले. पडवळ हे सुद्धा कारमधून उतरल्याचे पाहताच प्रवाशाने त्यांना जोरात धक्का देत ढकलून दिले. या संधीचा फायदा उचलत कार आणि मोबाईल घेऊन पसार झाला.
जखमी अवस्थेतील पडवळ यांनी भिवंडी कोनगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक गणपत पिंपळे यांनी गुन्हा दाखल करत मोबाईल लोकेशनद्वारे तपास करत अल्पवयीन मुलाला कार, मोबाईलसह खारेगाव सर्कल, कळवा येथून ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.