Crime sakal
मुंबई

मुंबई : पोलिसांच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया वाहतूक पोलिसाला बेड्या

सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : सायन पोलिस ठाण्याच्या (sion police station) हद्दीतील पालिका हॉस्पिटल परिसरात वाहतूक पोलिसांच्या (Fake traffic police) गणवेशात संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तोतया वाहतूक पोलिसाला माटुंगा वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला सायन पोलिसांच्या ताब्यात दिले. सूर्यकांत यशवंत माने (Suryakant mane arrested) असे त्याचे नाव असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत माटुंगा वाहतूक शाखेतील पोलिस नाईक संदीप शेलार हे फिर्यादी आहेत. यातील अटक आरोपी सूर्यकांत माने हा सध्या बीपीसीएल कंपनीसमोर (bpcl company) माहुल गाव चेंबूर येथील इमारत क्रमांक १९ मध्ये राहण्यास आहे.

आरोपी हा बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सायन हॉस्पिटल जंक्शन या ठिकाणी मुंबई वाहतूक पोलिसांच्या गणवेशात संशयितरीत्या फिरत असताना संदीप शेलार यांना आढळला. त्यामुळे त्यांनी पोलिस शिपाई सचिन राजाराम घागरे यांच्यासह गस्त घालतानाच हटकले. त्याने अंमलदाराचा गणवेश परिधान केल्याबद्दल विचारपूस केली. त्या वेळी त्याच्याकडे त्याचे ओळखपत्र, कार्यरत विभाग आणि इतर चौकशी केली. मात्र त्याने दिलेली सर्व माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला सायन पोलिस ठाणे येथे नेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीअंती गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक किरण भोसले तपास करत आहेत.

साहित्य हस्तगत : आरोपीकडून एक मोटरसायकल, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, महाराष्ट्र सुरक्षा बल अधिकारी यांचे ओळखपत्र, वाहतूक पोलिस अंमलदाराचा पूर्ण गणवेश, बेल्ट, नंबर प्लेट आदी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती माटुंगा वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक हरिदास किल्लेदार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT