मुंबई

फोन पे अॅपद्वारे लाखोंची फसणवूक

CD
सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ३ : फोन पे ॲपच्या स्क्रिन शॉटमध्ये फेरफार करून १४ ज्वेलर्स व ३२ हॉटेल चालकांना ३० लाखांचा चुना लावणाऱ्या भामट्याला वर्तकनगर पोलिसांनी गजाआड केले. सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर असे या आरोपीचे नाव असून तो एमबीए आयटी उच्चशिक्षित आहे. मूळचा छत्तीसगड विलासपूर येथील रहिवाशी असलेल्या सुब्रमण्यम बेरोजगार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने मोबाईल अॅपचा वापर करून ऑनलाईन पेमेंटद्वारे हॉटेल आणि ज्वेलर्स व्यावसायिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. ठाण्यातील ज्युपिटर येथील ब्लू स्टोन ज्वेलरीच्या दुकानात २८ जानेवारी रोजी एका तरुणाने ९७ हजार ३३० रुपये किमतीचे दागिने खरेदी केले. हे दागिने खरेदी केल्यानंतर आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले. पेमेंट केलेल्याचा स्क्रीनशॉट त्याने ज्वेलर दुकानदाराला दाखवला. मात्र दुकानदाराला शंका आल्याने दुकानदाराने दरवाजे बंद करून पोलिसांना पाचारण केले. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्या तरुणाचा डाव उघड झाला आणि पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण देशात १४ ज्वेलर्स आणि ३२ हॉटेल्समध्ये अशा प्रकारे फसवणूक करून ३० लाखांना गंडा घातला असल्याचे तपासात उघड झाले. असा झाला भांडाफोड सुब्रम्हण्यम हा ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या अॅपचा वापर करून क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचा. पहिले निश्चित रक्कमेचा ऑनलाईन व्यवहार करायचा, ते ट्रान्झेक्शन अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा १ रुपयांचा व्यवहार करत होता. नंतर १ रुपयांचा ट्रान्झेक्शन यशस्वी झालेला मेसेज आणि फेल झालेल्या ट्रान्झेक्शनचे स्क्रीन शॉर्ट अॅपच्या मदतीने एकत्र (मर्ज) करून व्यावसायिकाला दाखवून तेथून पोबारा करत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT