Thane Municipal corporation sakal media
मुंबई

ठाण्यात प्रभाग रचनेनंतर आरक्षणाचीही धाकधूक; नगरसेवकांचेही धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे (thane municipal corporation) बिगुल वाजले असून, प्रारूप प्रभाग रचना (ward structure) जाहीर झाली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार चार सदस्यीय संख्येत घट होऊन तीन सदस्यीय झाली आहे. या प्रभाग रचनेमुळे इच्छुकांसह आजी-माजी नगरसेवकांचेही (corporators) धाबे दणाणले आहेत. त्यात तीन सदस्यांमध्ये जर दोन महिलांसाठीचे आरक्षण पडले तर एका विद्यमान नगरसेवकाची दांडी गुल होणार असून, शेजारच्या प्रभागातून त्यांना आपले नशीब आजमावे लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाची (reservation tension) धाकधूक लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मागील निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग होते. त्यात नव्या प्रभाग रचनेनुसार तीन सदस्यीय पद्धत असल्याने पालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. या रचनेत अनेक प्रभागांची मोठ्या प्रमाणात तोडमोड करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभाग अतिशय छोटे, तर काही भले मोठे करण्यात झाले. अशातच आता आरक्षण कशा पद्धतीने पडणार याची चिंताही इच्छुकांना जाणवू लागली आहे.

लोकसंख्येनुसार अनुसूचित जातींची (एससी) सर्वाधिक टक्केवारी असलेल्या १० प्रभागांमध्ये हे आरक्षण टाकले जाणार आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२ हजार ६९८ इतकी असून त्यांच्यासाठी तीन प्रभाग राखीव असतील. त्यातले दोन महिलांसाठी ठेवले जाणार आहेत. २०११ च्या लोकसंख्येनुसार एससींची लोकसंख्या १ लाख २६ हजार होती. त्यांच्यासाठी १४२ पैकी १० जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी असतील. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रभागातील एससी मतदारांची संख्या जाहीर केली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर आरक्षणाची धाकधूक इच्छुकांमध्ये लागली आहे.

देव पाण्यात

तीन सदस्यीय पद्धत असल्याने विद्यमान तसेच इच्छुकांची मोठी कसरत होणार आहे. एका प्रभागात दोन नगरसेवक असताना त्या ठिकाणी दोन महिलांचे आरक्षण पडल्यास एकाला माघार घ्यावी लागणार आहे. असेही न झाल्यास त्याला आपल्या पत्नीला रिंगणात उतरावे लागणार किंवा बाजूच्या प्रभाग शोधावा लागणार आहे. त्यामुळे किमान आपल्या प्रभागात एका महिलेचे आरक्षण पडो, अशी इच्छा अनेकांनी बोलावून दाखविली आहे. अनेकांनी तर त्यासाठी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT