drama sakal
मुंबई

मिरा-भाईंदरच्या नाट्यगृहाची कलाकारांकडून पहाणी

महापालिकेच्या महामार्गालगत असलेल्या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

CD

भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या बांधकाम सुरू असलेल्या नाट्यगृहाची नाट्य कलांवत आणि निर्मात्यांनी नुकतीच पाहणी केली. कलाकारांच्या आणि नाट्यप्रयोगाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या काही सुधारणा यावेळी कलाकारांकडून सुचविण्यात आल्या. एप्रिल महिन्यात या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे

आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी घोषित केले.
महापालिकेच्या महामार्गालगत असलेल्या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च अखेर ते पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या नाट्यगृहात नाट्य कलावंत, निर्माते यांच्या दृष्टिकोनातून काय सुधारणा करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी नाट्यकलावंत आणि निर्माते यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार नाट्य कलावंत भरत जाधव, शरद पोंक्षे, अभिनेते व आर्किटेक्ट राजन भिसे, सुशांत शेलार आदींनी नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले देखील उपस्थित होते.
नाट्यगृहात जे नाट्य प्रयोग होतील त्या नाटकांची बस येण्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध करावी, नाटकाचे सेट नाट्यगृहात नेण्यासाठी मोठी लिफ्ट असावी, कलाकारांच्या मेकअप रूम यासह आवश्यक त्या गोष्टी करण्याबाबत कलाकारांनी सूचना केल्या. तसेच नाट्यगृहात ध्वनी योजना, प्रकाश व्यवस्था, रंगमंचाची व्यवस्था यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली.
नाट्यगृह बांधत असताना उद्‍घाटनापूर्वी कलाकारांना बोलावून त्यांच्या नाट्यगृहाबाबतच्या सूचना जाणून घेण्याची कल्पना कौतुकास्पद आहे.
- शरद पोंक्षे, अभिनेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT