Thane Municipal Corporation budget sakal
मुंबई

ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामकरणाचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane municipal corporation) सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले (election update) असून प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनादेखील मागविण्यात येत आहेत. अशातच अनेक नगरसेवकांनी (corporators) आपल्या प्रभागातील विविध कामांच्या भूमिपूजनासह विकासकामाच्या (developments inauguration) लोकार्पणासाठी लगीनघाई सुरू केली आहे. त्यातच येत्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विविध भागातील रस्त्यांना, उद्यानांना, चौकांना नाव देण्याचे सुमारे १९ प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधिंनीदेखील नगरसेवक निधीतून, प्रभाग सुधारणा निधीतून करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण करणे; तर करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधीच्या कामांचा सपाटा सध्या शहराच्या विविध भागात सुरू झाला आहे. अशातच आता मागील काही महिन्यांपासून सर्वसाधारण सभेच्या पटलावर नामकरणाचे प्रस्ताव पटलावर येऊ लागले आहे.

त्यातच येत्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर १९ नामकरणाचे प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये राम मारुती रोड येथील चौकाचे नामकरण, लुईसवाडी येथे उभारण्यात आलेले उद्यान, घोडबंदर भागातील टकरडा रोड, ओवळा नाका रस्ता, श्रीराम हॉस्पिटल येथे रस्ता, हावरे सिटी, तीन पेट्रोल पंप चौका ऐवजी आता ठाणे रेडक्रॉस चौक, पातलीपाडा ब्रीज जवळील चौक आदींचा समावेश आहे.

विकासकामांना वेग

मागील दोन वर्षे कोरोनामुळे नगरसेवकांच्या प्रभागातील कामे रखडली होती. मात्र, आता आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ लागल्याने व निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा कामांनी जोर धरल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT