kal river sakal media
मुंबई

माणगाव काळनदीच्या पात्रात मगरीची दहशत; मच्छीमारावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : येथील काळ नदीच्या पात्रात (Mangaon kal river) बुधवारी (ता.१६) एका तरुणावर मगरीने हल्ला (crocodile attack) केला होता. या तरुणाचे प्राण वाचले असले तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. माणगाव काळ नदी किनारी झोपडपट्टीत (slum) राहणारे सचिन पवार आणि त्यांचा भाऊ नितीन पवार हे काळ नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नितीन हे जाळे काढण्यासाठी उतरले असताना मगरीने हल्ला केला.

नितीनने आरडाओरडा केल्याने सचिन आणि अन्य एक मित्र संजय काळे यांच्यासह झोपडपट्टीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे नितीन याचे प्राण वाचविले. या हल्ल्यामध्ये नितीन याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. माणगाव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला केलेली मगर ही सहा फूट असावी, असा अंदाज आहे.

१४ वर्षांपूर्वी माणगाव काळ नदीच्या पात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात मृत मगर सापडली होती. सध्या या मगरीमुळे माणगाव शहरात भीतीचे वातावरण आहे. वन विभाग अधिकाऱ्यांनी मगरीची शोध मोहीम सुरू करावी, अशी माणगावकरांची आहे. नदीकिनारी असलेल्या झोपडपट्टीतील नागरिक आणि माणगावकरांनी घटनेची दखल घेत सावध राहावे, असे आवाहन माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT