Metro sakal media
मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये मेट्रोविरोधात संघर्ष; एक हजाराहून अधिक हरकती

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदरच्या (Bhayandar) पुढे राई, मोर्वा गावापर्यंत विस्तारलेला मेट्रो मार्ग आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधात (Metro carshed) ग्रामस्थांकडून आतापर्यंत एक हजाराहून अधिक हरकती नोंदवण्यात (Objection) आल्या आहेत. शिवाय उद्या (सोमवार) देखील आणखी हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, मेट्रोविरोधातील (Metro) संघर्ष आणखी तीव्र करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.

भाईंदरपर्यंत येणाऱ्या मेट्रोचा पुढे राई, मोर्वा गावापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गामुळे ग्रामस्थांची घरे तोडावी लागणार आहेत, शिवाय कारशेडसाठी ग्रामस्थांच्या जमिनीदेखील संपादित कराव्या लागणार आहेत. मात्र पिढ्यान्‌ पिढ्यांची घरे तोडण्यास तसेच उपजीविका अवलंबून असलेल्या शेतजमिनी मेट्रो कारशेडसाठी देण्यास ग्रामस्थांनी ठाम नकार दिला आहे. या मुद्द्यावर ग्रामस्थांविरुद्ध मेट्रो, असा संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, कारशेडसाठीच्या जमीन संपादनप्रकरणी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेवर स्थानिक पातळीवर एक हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. १९ फेब्रुवारी ही हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची मुदत होती, मात्र सुटीचा दिवस असल्याने ग्रामस्थांकडून सोमवारीही हरकती दाखल केल्या जाणार आहेत.

आतापर्यंत ६००च्या आसपास हरकती प्रत्यक्ष दाखल करण्यात आल्या आहेत, तर पावणे तीनशेहून अधिक हरकती ऑनलाईन नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेकांनी आपापल्या वकिलांमार्फतही हरकती दाखल केल्या आहेत, तर काहींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रारी केल्या आहेत. सोमवारी देखील शेकडो हरकती दाखल केल्या जाणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थ अशोक पाटील यांनी दिली.

न्यायालयात जाण्याची तयारी...
मेट्रोविरोधात येत्या बुधवारी २३ फेब्रुवारीला राई येथील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या पटांगणात सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अनुभवी वकील, तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मेट्रोविरोधात आता ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले असून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT