missing children back to home
missing children back to home sakal media
मुंबई

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’; जानेवारीत एक हजार मुलांची केली घरवापसी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घरातून पळून आलेल्या, वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबापासून विभक्त झालेल्या वा हरवलेल्या मुलांना (Missing children cases) त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम ‘आरपीएफ’द्वारे (RPF) हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ (Operation Nanhe Farishte)अंतर्गत मुलांची घरवापसी केली जात आहे. जानेवारीत विविध स्थानकांवरून १०४५ मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. त्याच वेळी ४२ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आरपीएफला यश आले आहे.

शहरांचे आकर्षण, कुटुंबियांशी वाद इत्यादी कारणांमुळे मुले-मुली घर सोडून पळून जातात. ही मुले रेल्वे स्थानकांवर येतात. स्थानकांत एकट्याने फिरणाऱ्या मुलांची चौकशी केली जाते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची माहिती माहिती गोळा केली जाते. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येते. जानेवारीत एकूण ७०१ मुले आणि ३४४ मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले; तर भारतीय रेल्वेच्या १३२ रेल्वे स्थानकांवर बाल मदत कक्ष उभारण्यात आला आहेत.

रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई

‘मिशन जीवनरक्षा’अंतर्गत आत्महत्या करण्यासाठी रेल्वेगाड्यांखाली येणाऱ्यांचे प्राण वाचवण्यात ‘आरपीएफ’ला यश आले आहे. अनेकदा प्रवासी घाईत रेल्वे रूळ ओलांडतात; तर काही जण रेल्वे रुळांवर स्वतःला झोकून देतात. असा प्रयत्न करणाऱ्या २० पुरुष आणि २२ महिला मिळून ४२ जणांचे प्राण वाचवले आहेत.

तस्करीला आळा

रेल्वेच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचा अवैध व्यापार करणाऱ्या तस्कारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली आहेत. जानेवारीत प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. दुर्मिळ कासव, विविध प्रजातींचे जंगली पक्षी, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली गिधाडे जप्त करून ती वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT