new tunnel work at mumbai pune expressway will reduce traffic jams 
मुंबई

मुंबई : ‘एमटीएचएल’ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याची योजना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई-पुणे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) मार्ग मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवेला (Mumbai-pune express way) जोडण्याची योजना आखली आहे. यासाठी एमएमआरडीएने या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्ल्गाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

देशातील सर्वात मोठा २१.८ किमी लांबीचा समुद्री मार्ग असलेला एमटीएचएल प्रकल्प एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून या मार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जोडली जाणार आहेत. हा मार्ग खुला होताच दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्‍यता आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग ४ बी वरील चिर्ले येथे जोडला जाणार आहे. या मार्गावरून दररोज सुमारे ७० हजार वाहनांची ये-जा करण्याचा अंदाज आहे.

‘एमटीएचएल’ मार्ग मुंबई-पुणे महामार्गास जोडण्याचे नियोजन एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी केले होते. मात्र एमटीएचएल मार्गाचे काम विलंबाने सुरू झाल्याने हा विचार मागे पडला होता. या मार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने एमएमआरडीएने पुन्हा एमटीएचएल आणि मुंबई-पुणे एस्क्‍प्रेस-वे ला जोडण्याची योजना आखली आहे.

वरळी ते पुणे थेट प्रवास

एमएमआरडीएने या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार कंपन्यांना मार्चपर्यंत निविदा भरता येणार आहेत. याच महिन्यात निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास नवी मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच प्रवाशांना थेट वरळीहून शिवडी, नवी मुंबईमार्गे पुण्याला जाता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT