Traffic police sakal media
मुंबई

पनवेल : महागड्या दुचाकीची पोलिसांना भुरळ; तपासणीनंतर चक्क फोटोसेशन

दिपक घरत

पनवेल : वेगाने धावणाऱ्या परदेशी महागड्या दुचाकीने (Sports bike) सध्या तरुणाईला भुरळ घातली आहे. हीच भुरळ शीव-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे पाहायला मिळाली. लाखों रुपयांची दुचाकी महामार्गावरून जात असताना वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) तपासणीसाठी अडवली. मात्र, दुचाकीच्या आकर्षणामुळे पोलिसांनी तपासणीनंतर चक्क फोटोसेशन (Photoshoot on sports bike) सुरू केले. या फोटोसेशनमुळे दुचाकीचालक तरुण मात्र काही वेळ बुचकळ्यात पडला होता.

परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या महागड्या गाड्यांचे वेड आपल्या देशात पूर्वीपासूनच आहे. धूम चित्रपटात दुचाकीवर दाखवण्यात आलेल्या स्टंटमुळे या वेडात आणखी भर पडली आहे. पेण तालुक्यातील गडब गावात राहणारा जयेश पाटील हा युवक मंगळवारी (ता. २२) शीव-पनवेल महामार्गावरून घरी निघाला होता. या वेळी कळंबोली सर्कल येथे वाहतूक विभागातील पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमन व वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या जयेशला त्यांनी अडवले. कर्मचाऱ्यांनी त्याला दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली. त्यानंतर दुचाकी किती लाखांची आहे, अशी चौकशी केली.

त्यावर दुचाकीचालकाने ३० लाखांची दुचाकी असल्याचे सांगताच पोलिस अचंबित झाले.
त्या दुचाकीच्या आकर्षणामुळे वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीसोबत फोटो काढू देण्याची विनंती केली. दुचाकीचालकाने होकार देताच दुसऱ्याच मिनिटात वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. गडब गावातील जयेश हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, त्याला महागड्या दुचाकीचे आकर्षण असल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT