Shivsena sakal media
मुंबई

मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; अमोल पाटील नगराध्यक्षपदी

भगवान खैरनार

मोखाडा : मोखाडा नगरपंचायतीवर (Mokhada Nagar panchayat election) शिवसेनेने पुन्हा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आघाडीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने शिवसेनेचे अमोल पाटील (Amol patil) नगराध्यक्षपदी; तर उपनगराध्यक्षपदी नवसू दिघा (Navasu digha) बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मोखाडा नगरपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सदरची निवडणूक नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक (Ravindra phatak) यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली आहे. या निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला आहे.

नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर महिन्यांनंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि जिजाऊ सामाजिक संघटनेची युती केली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अमोल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता; तर काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकप आघाडीकडून प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मंगळवारी (ता.२२) प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आज अधिकृतरीत्या शिवसेनेचे अमोल पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे; तर उपनगराध्यक्षपदी नवसू दिघा हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

मोखाडा नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल

एकूण सदस्य संख्या - १७.
शिवसेना - ८
राष्ट्रवादी - ४
जिजाऊ संघटना - २
भाजप - २
काँग्रेस - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT