Swapnil Bandodkar sakal media
मुंबई

आयुष्यात कष्ट करण्याची तयारी ठेवा, यश नक्की मिळते - स्वप्नील बांदोडकर

मिलिंद तांबे

मुंबई : सुरुवातीच्या काळात मलाही दहा वर्षे संघर्ष (Struggle in life) करावा लागला. माझे सुरुवातीचे अनेक अल्बम अपयशी ठरले. मात्र, मी हार मानली नाही. मी चिकाटीने आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला ‘राधा ही बावरी’च्या (Radha hi bawari song) निमित्ताने यश मिळाले. तुम्हीही कधी हार मानू नका. आयुष्यात कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश नक्की मिळते, असा सल्ला प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर (swapnil bandodkar) याने दिला. आपल्या संगीतमय कारकिर्दीतील अनुभव त्याने ‘यिन’च्या (Sakal YIN) तरुणांसोबत शेअर केला.

प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या सान्निध्यात मी संगीताचे धडे गिरवले. ते मला नेहमी सांगायचे की, स्वतःला पूर्ण तयार केल्याशिवाय गायन क्षेत्रात किंवा चित्रपट जगतात उतरू नकोस. त्यामुळे मी स्वतःवरच प्रचंड मेहनत घेतली. त्यातूनच एके दिवशी ‘राधा ही बावरी’ अल्बम तयार झाला. त्यातली गाणी रसिकांना प्रचंड आवडली. आमचे गाण्यातील जे प्रयोग आधी रसिकांनी नाकारले होते तेच नंतर त्यांना भावले.

माझी ‘गालावर खळी’ अन् ‘राधा ही बावरी’ गाणी त्यांनी डोक्यावर घेतली. आजही रसिक माझ्या गाण्यांवर भरभरून प्रेम करतो. त्यातून मी एक शिकलो की, आयुष्यात कितीही अपयश आले तरी खचून जायचे नाही. मेहनत करत राहायची. आपल्याला यश मिळतेच. त्यामुळे कधीही अपयशाला घाबरू नका. त्याचा सामना करा. तुम्हाला आयुष्यात यश नक्की मिळेल, असा आत्मविश्वास स्वप्नीलने युवकांना दिला. युवकांच्या आग्रहाखातर स्वप्नीलने ‘गालावर खळी’ आणि ‘राधा ही बावरी’ गाणी सादर केली. युवकांनीही तालावर ठेका धरून गाण्याचा आनंद घेतला.

खचून गेलो नाही

गायन क्षेत्रात साधारण २५ वर्षांपूर्वी मी स्ट्रगल सुरू केला. माझ्यासोबत प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आणि गायिका वैशाली सामंतही होत्या. आम्ही तेव्हा मराठी गाण्यांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले. मात्र, तेव्हा तो ट्रेंड नव्हता. त्यामुळे आमची गाणी रसिकांना रुचली नाहीत. सुरुवातीचे माझे सात ते आठ अल्बम अपयशी ठरले. त्यानंतर खचून न जाता मी स्वतःमध्ये काही बदल केले. पुन्हा काही प्रयोग केले आणि अखेर यश मिळाले, असे स्वप्नील बांदोडकर म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रमक केला

SCROLL FOR NEXT