माजी मंत्र्यांसाठी ‘यिन फोरम’
नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, ता. २६ : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)तर्फे आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी युवकांना यशस्वी जीवनाचा कानमंत्र दिला. शनिवारी (ता. २६) ‘यिन’च्या माजी मंत्र्यांसाठी ‘यिन फोरम’ची सुरुवात करण्यात आली. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते फोरमचे उद्घाटन करण्यात आले.
‘यिन’चे जाळे राज्यभरात विस्तारले आहे. गेल्या सात वर्षांत ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी नवीन नेतृत्व उदयास आले आहे. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही ‘यिन’चे तरुण माजी मंत्री वेगेवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांना ‘यिन फोरम’च्या माध्यमातून पुन्हा एकदा जोडण्यात आले आहे. ‘यिन’च्या माध्यमातून तरुणांचा सर्वांगीण विकास होत आहे. आता फोरममुळे माजी विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना केले.
एखादा उपक्रम सुरू करणे सोपे आहे; परंतु त्यात सातत्य ठेवणे अवघड असते; मात्र ‘यिन’ने गेली सात वर्षे हा मंच उपलब्ध करून महाराष्ट्र घडवण्याचे कौतुकास्पद काम केले, असे कौतुकही गोऱ्हे यांनी केले.
‘यिन फोरम’मध्ये माजी मुख्यमंत्री संदीप पालवे, अनिकेत मोरे, अजय खांडबहाले, सदस्य कृतिका चौधरी, पालकमंत्री यश देवधर, माजी सभापती आकाश शिंदे, माजी पालकमंत्री दिव्या भोसले आदींचा सहभाग आहे.
‘यिन’ फोरमचा विश्वास
फोरमच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया ‘यिन’ मंत्रिमंडळाचे पहिले मुख्यमंत्री संदीप पालवे यांनी दिली. फोरमच्या व्यासपीठावरून ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण करून घेण्यास वाव असल्याचे यश देवधर म्हणाले. ‘यिन’ने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिल्याने त्यांचे आभार. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जनतेशी जोडता येईल याचा आनंद आहे, असे कृतिका चौधरी म्हणाल्या. फोरमच्या माध्यमातून पुन्हा तरुणांची सत्ता स्थापन करण्याची संधी आहे, असा विश्वास अजय खांडबहाले यांनी व्यक्त केला. फोरममुळे राजकारणासह सामाजिक काम करण्याची संधी मिळणार असल्याचे दिव्या भोसले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.