मुंबई

फातीमा शेख यांच्यावर पहिले उर्दु पुस्तक प्रकाशित

CD

फातीमा शेख यांच्यावर पहिले उर्दु पुस्तक प्रकाशित

मुस्लिम महिलांना शिक्षणाची प्रेरणा

दिनेश चिलम मराठे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः मुस्लिम धर्मातील पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख यांचा कार्याचा परिचय अजूनही मुस्लिम समाजाला झालेला नाही. महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी दीडशे वर्षांपूर्वी शिक्षण प्रसाराचे काम केले. जोतिबा, सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे फातिमा शेख यांना मुस्लीम समाजातून विरोध झाला. मात्र, त्याला न जुमाता फातीमा शेख यांनी मुस्लीम मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत केली.फातीमा यांना जाऊन दिडशे वर्षे उलटल्यानंतर त्यांच्या कार्यावर पहिलं वहिल उर्दु पुस्तक प्रकाशित झाले आहे. फातीमा शेख यांचे काम सर्वामान्य मुस्लीम बांधवाना कळावे म्हणून उर्दू हे पुस्तक काढण्यात आल्याचे प्रकाशकांनी सांगीतले.
लेखक दिनकर काकडे यांनी मराठीत लिहिलेल्या पुस्तकाचा हा उर्दु अनुवाद आहे. शैक्षणिक क्रांतीचे बीज पेरणाऱ्या फातिमा शेख यांच्यासारख्या महिलेच्या कामाची मुस्लीम समाजाला ओळख करून गरजेचे आहे. त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन मुस्लीम समाजाने आपला सामाजिक, आर्थिक स्तर वाढवावा असं आवाहन रेल्वेचे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांनी पुस्तकाचे प्रकाशन करताना केले.
रेल्वे पोलिस सेवेत ३९ वर्षे काम केलेल्या शेरु खान यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. लॉकडाऊच्या काळात एका व्हाट्‌स एप ग्रूपमध्ये त्यांनी हे पुस्तक वाचलं होत.त्यांनी पाच पुस्तक मागवली. दोन ते तीन वेळा पुस्तक वाचून काढल्यानंतर शेरु यांना वाटलं की महात्मा फुले, सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी दीडशे वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या म्हणून आज आपण शिकू शकलो. त्यामुळे फातीमा शेख यांचे काम जगापुढे आले पाहिजे. आजही मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उर्दु भाषेत शेख यांच्या कामाचा परिचय होण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे शेरु खान यांनी सांगितले.
लवकरच हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध केले जाईल, असे शेरु खान म्हणाले.
या पुस्तकाचा उर्दु अनुवाद खान अब्दुला यांनी केला आहे. यापुर्वी त्यांनी अभ्यासक्रमातील मराठी पुस्तकांचा उर्दुमध्ये अनुवाद केला आहे. सकाळशी बोलतांना अब्दुला सांगतात, फातीमा शेख यांच्याबद्दल मला थोडीफार माहिती होती. मात्र अनुवाद करताना पहिल्यांदा फातीमा शेख यांचे काम किती मोठे आणि कठिण होते हे कळालं. या पुस्तकाचा अनुवाद करुन मनाला खूप समाधान मिळाले. फातीमा शेख या मुस्लीम समाजातील ''फॉर्गेटन हिरो'' आहेत. त्यांचे काम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवं, असे त्यांचे म्हणणे आहे.
कुराण मध्ये पहिले अक्षर इकरा आहे याचा अर्थ वाच असा होतो म्हणून आम्ही मुलाना वाच म्हणतो. मुलगी शिकली की समाजाची प्रगती होते. त्यामुळे शेख यांची प्रेरणा सर्वांनी घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे ठरेल, असे शिक्षिका शाईस्ता सुल्ताना खान यांनी सांगितले.
.....
फातीमा शेख यांचे डूडल
त्यावेळी समाजाच्या दबावामुळे ज्योतिबा फुले यांच्या वडिलांनी ज्योतिबा, सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढलं, त्यावेळी फातीमा शेख यांचा भाऊ, उस्मान शेख यांनी सामाजिक बहिष्कार झुगारत फुले दाम्पत्याला आपल्या घरी ठेवले होत. फातीमा शेख यांच्या १९१ व्या जंयतीनिमीत्ताने गूगलने फातीमा शेख यांचे डूडल काढून त्यांच्या कामाचा सन्मान केला.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : २२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन; चिठ्ठीवरून पाच तरुणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT