Haldi kumkum event sakal media
मुंबई

गावागावांत रणधुमाळी शिगेला; निवडणुकीच्या तोंडावर हळदी-कुंकू समारंभाचा धडाका

शुभांगी पाटील

तुर्भे : गावागावांत पालिका निवडणुकीची (Municipal corporation election) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली, तरी इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांनी (Former corporators) आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रमांसह मेळावे, हळदी-कुंकू समारंभाचा (Haldi-kukkum event) धडाका लावला आहे. जाहीर प्रचार सुरू झाला नसला, तरी वैयक्तिक गाठीभेटी सुरूच आहेत. यंदाच्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार असल्याने एका प्रभागात स्वतः, तर दुसऱ्या प्रभागातून बायकोला निवडणुकीच्या रिंगणात (husband-wife election candidates) उतरवण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर गाव-गावठाण, झोपड्या व विभाग ढवळून निघाले आहेत. भाऊबंदकी उफाळून आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. प्रचारासाठी यंदा वेगवेगळे तंत्र वापरले जात आहेत. त्यात समाज माध्यमांचा वापर अधिक वाढलाय. इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवकांनी तर आपापल्या प्रभागातील मतदारांचा वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. शुभ सकाळ, शुभ रात्री आणि आपल्या कामाचा व प्रभागात होणाऱ्या कार्यक्रमाचा व्हिडीओ टाकून मतदारांवर आपली छाप पाडण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे.

तसेच अनेकांनी मतदारांना खूश करण्यासाठी त्‍यांचे वाढदिवसही आपल्या कार्यालयात साजरे करत आहेत. अनेकांच्या कार्यालयात आतापासूनच मेजवाण्या सुरू झाल्या आहेत. त्यात प्रभागातील मतदारांना खूश करण्यासाठी बॅनरवर त्यांचे फोटो छापले जात आहेत.
उमेदवारापेक्षा कार्यकर्ताच जास्त व्यस्त झाला आहे. त्यात बहुतांश उमेदवारांनी मोबाईलवरील मेसेजचे पॅकेज खरेदी केले आहे. एकाच वेळी मतदारांना हे लिखित संदेश आणि व्हाईस कॉल पाठवले जातात. प्रभागातील कामांचे आणि कार्यक्रमाचे ऑडिओ व व्हिडिओ सीडीही बनवून घेण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तरुणाई हे काम कमी-जास्त पैशांत करतात. सध्या पक्षांतराचे वादळच सुरू आहे. शेकडो कार्यकर्ते घेऊन पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोनाचा विसर, निवडणुकीचा फिव्हर

निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने कोरोनाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनामुक्त शहर झाल्याचे चित्र एकंदरीत नवी मुंबईत राजकारण्यांनी तयार केले आहे. गेल्या वर्षी फक्त कोरोना एके कोरोनावरच चर्चा रंगली जात होती; मात्र आता कोरोनाचा विसर पडल्याने जो तो फक्त पालिकेच्या निवडणुकीबाबतच चर्चा करत आहेत. बघावं तिथे फक्त एकच चर्चा ती म्हणजे निवडणूक.

डीपीचा तगादा

काही उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांना मोबाईलवर आपला डीपी ठेवायला सांगितले आहे. एखाद्याने आपला डीपी ठेवला असेल, तर तो आपला पक्का समर्थक आहे, हे उमेदवार ओळखतो. कुणीकुणी डीपी ठेवला आहे, हे आवर्जून तपासतात.

सामाजिक कार्यकर्तेच रिंगणात

सध्या प्रभागाचा उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्‍घाटन जोरात सुरू झाले आहे.

गाण्यांवर भर

अनेक उमेदवारांनी ऑडिओ व व्हिडीओ सीडी तयार करताना गाण्यांचा वापर केला आहे. त्यात ‘तुफान आलंया’, ‘दे धक्का’, ‘जय हो, विजयी भव:’ या गाण्यांची मोठी चलती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT