Gold Fraud sakal media
मुंबई

नवी मुंबई : कमी किंमतीत सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला पाच लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कमी किमतीत सोने देण्याच्या बहाण्याने (Gold in low price) एका टोळीने हैद्राबाद येथील एका हॉटेल व्यावसायिकाला (Hotel businessman) महापे येथे बोलावून त्याला सोने न देता त्याच्याकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (turbhe midc police) या टोळीविरोधात फसवणुकीचा (Fraud case filed) गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या हॉटेल व्यावसायिकचे नाव शमशुद्दीन फरीदउद्दीन (३३) आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील हाजीभाई नावाच्या व्यक्तीने शमशुद्दीन याच्याशी फेसबुकद्वारे मैत्री वाढवून त्याच्याशी संवाद सुरू केला होता.

त्यानंतर हाजी भाई याने तो सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगून सोन्याची छायचित्रे पाठवली. शमशुद्दीन याने सोन्याचा व्यवसाय करण्याची तयारी दर्शवल्यानंतर हाजीभाई याने त्याला गुजरात भुज येथे बोलावून घेतले होते.

तसेच त्याला सोन्याचे बिस्कीट दाखवून हे सोने प्रतिकिलो ४२ लाख रुपयेप्रमाणे असल्याचे सांगितले; मात्र त्याला ८० लाख रुपयांमध्ये दोन किलो सोने देण्याचे आश्वासन देऊन त्याला पाच लाख रुपये आगाऊ देण्यास सांगितले. त्यानुसार पैसे दिले; मात्र हे पैसे घेऊन हाजीभाईने पलायन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT