Corona Center sakal media
मुंबई

मुंबईतील कोरोना केंद्र बंद होणार; सीसीसी- २ मध्ये फक्त ४ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जम्बो कोविड केंद्रानंतर (Jumbo corona center) पालिकेने प्रभाग स्तरावर विलगीकरणासाठी बनवलेले कोरोना काळजी केंद्र (सीसीसी) बंद करण्याची तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेत (corona third wave) २३ कोविड केंद्र सक्रिय करण्यात आली होती. त्यापैकी केवळ सात केंद्र सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या प्रत्येक विभागामध्ये एक केंद्र कार्यरत असणार आहे. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना अलग ठेवण्यासाठी पालिकेने (bmc) कोविड केंद्र- २ ची स्थापना केली होती आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या अतिजोखीम गटातील रुग्णांना अलग ठेवण्यासाठी कोविड केंद्र- १ तयार केले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तयार केलेली केंद्रे पालिकेने वेळोवेळी सक्रिय केली. आता पालिकेने जम्बो कोविड केंद्राप्रमाणे ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक विभागामध्ये एकच केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने ३ ते ४ प्रभागांचा झोन तयार केला आहे. याअंतर्गत शहर आणि उपनगरातील केवळ सात केंद्रे कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीसीसी- २ मध्ये फक्त ४ रुग्ण

सौम्य लक्षणे असलेल्या आणि नसलेल्या रुग्णांना अलग ठेवण्यासाठी पालिकेने प्रभाग स्तरावर १०० सीसीसी- २ केंद्रे स्थापन केली होती. यामध्ये सुमारे १४ हजार खाटांची व्यवस्था होती. तिसऱ्या लाटेत फक्त ८ सीसीसी- २ केंद्र सुरू केले होते, ज्यामध्ये १७०० खाटा कार्यान्वित करण्यात आल्या. पालिकेच्या डॅश बोर्डानुसार या १७०० खाटांपैकी फक्त चार खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.

सीसीसी- १ केंद्रात ५४२ रुग्ण

कोरोना संक्रमितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या अतिजोखमीच्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात १२९ सीसीसी- १ बनवली होती, ज्यात २२,४०० खाटांची व्यवस्था होती. तिसऱ्या लाटेत केवळ १५ सीसीसी- १ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, त्यात ६ हजार खाटांची तरतूद होती. त्यापैकी केवळ ५४२ खाटांवर रुग्ण दाखल आहेत.

७०० बेड कार्यरत राहणार

कोरोना रुग्णांची घटलेली संख्या पाहता पालिका सीसीसी- १ आणि २ मध्ये फक्त १०० खाटा सक्रिय ठेवणार आहे. ७ झोनमध्ये ७०० खाटा क्वारंटाईनसाठी ठेवण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राखीव ठेवलेल्या २८ हजार खाटा आता पूर्णपणे निष्क्रिय करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT