Corona Updates
Corona Updates  sakal media
मुंबई

मुंबईत कोरोना आलेख उतरणीला; फेब्रुवारीमध्ये आढळले ९६ टक्के कमी रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. पालिकेच्या (bmc) आरोग्य विभागाच्या दैनंदिन आकडेवारीनुसार जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ९६ टक्के कमी रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीमध्ये नवीन रुग्णांची संख्या (corona new patients) दोन लाख ४७ हजार ७० इतकी होती. त्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये केवळ नऊ हजार ७९ रुग्ण आढळून आले आहेत.

२१ डिसेंबरला मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने दस्तक दिली होती. त्यानंतर, नवीन रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढला. जानेवारी महिन्यात एका दिवसात मुंबईमध्ये २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून नवीन रुग्णांचा आकडा नियंत्रणात आला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नवीन रुग्णांची संख्या तीन आकड्यांमध्ये येत होती. मात्र, फेब्रुवारीअखेर ही संख्या दोन अंकांवर आली आहे. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारीमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू न होणाऱ्या दिवसांचाही विक्रम झाला आहे. फेब्रुवारीमध्ये ९ वेळा मुंबईत कोरोनामुळे मृतांचा आकडा शून्य होता; तर दुसऱ्या लाटेत डिसेंबरमध्ये ७ वेळा शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे.

चाचण्यांमध्ये ५० टक्के घट

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कोरोना चाचणीत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारीमध्ये १५ लाख ७१ हजार २०१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये केवळ आठ लाख ४२ हजार ९७३ नागरिकांचीच कोरोना चाचणी झाली. तिसऱ्या लाटेत केंद्र सरकारने कोविड चाचणीच्या नियमांमध्ये सुधारणा केली होती. नवीन नियमांनुसार केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांचीच चाचणी केली जाणार होती. त्यामुळेच चाचण्यांमध्ये घट झाली आहे.

लसीकरणही कमी

कोरोना चाचण्यांप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणही कमी झाले. जानेवारी महिन्यात लशीचे १३ लाख ६६ हजार ६४१ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले; तर फेब्रुवारीमध्ये लसीकरण केंद्रांमध्ये लाभार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने हा आलेख सात लाख ३० हजार ५३८ पर्यंत घसरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT