Anand paranjpe sakal media
मुंबई

ठाणे : महापौरांची स्वबळाची भाषा कोणाच्या आदेशावर? परांजपेंची खोचक टीका

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत आहेत; मात्र ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे शिवसेना-भाजप युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते, याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand paranjpe) यांनी लगावला आहे.

माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल, तर मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये युती असल्याचे म्हस्के यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. आनंद परांजपे म्हणाले की, म्हस्के यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरंतर त्यांची महापौरपदाची अडीच वर्षांची कारकीर्द आज संपली आहे.

महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत असताना, शिवसेना आणि भाजप ही युती असल्याचे संभाषण करीत स्वबळाचा नारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, ३० वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि महापौर हे सेना-भाजपची युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करीत आहेत. याचा खुलासा पालकमंत्री शिंदे यांनी करायला हवा, असे त्यांनी म्हटले.

१४२ नगरसेवकांचाही दावा करावा

म्हस्के यांनी स्वबळाचा नारा दिला. आम्ही त्यांना शुभेच्छा देत निर्णयाचे स्वागतच करतो; मात्र पक्षप्रमुख ठाकरे यांनी, जिथे शक्य आहे; तिथे महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे आवाहन केले आहे. त्यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडी ठाण्यात गठित झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मात्र ठाण्यात १४२ पैकी १४२ नगरसेवक शिवसेनेचेच निवडून येतील, असे मस्के यांनी म्हटले नाही, याचे आश्‍चर्य वाटते, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT